राजेंद्र हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा

     

    नवे पारगाव: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा झाला. मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.
    प्राथमिक आरोग्य केंद्र अंबपच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल साठे, डॉ. स्मिता डोईजड, डॉ. प्रणाली सुतार, विद्यादेवी लोहार, विजया पाटील सुनंदा ठवरे, अमृता जाधव यांचा महिला दिनानिमित्त सन्मान झाला.
    यावेळी पर्यवेक्षक विद्यादेवी लोहार,नवनाथ शेरखाने, दिलीप चरणे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील व विध्यार्थीनिंची भाषणे झाली.सुनील कावळे, डी. आर. पाटील, मुकेश पाटील, वसंत धुदंरे, सुनील कांबळे,राजू दाभाडे आदी उपस्थित होते.समृद्धी शिंदे व निकिता दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र सुर्यवंशी यांनी आभार मानले.