दुःख ,वेदना,संकटाना तोंड देऊन संघर्षाच्या वाटेवरील वाटचाल करणारी प्रवासी

    दुःख ,वेदना,संकटाना तोंड देऊन संघर्षाच्या वाटेवरील
    वाटचाल करणारी प्रवासी श्रीमती आशाताई बच्छाव
    “तुम्हे हिरे की किमत है,तो अंधेरे मे मिलो! धुप मे काँच के
    तुकडे भी चमक जाते है” अस जर म्हटलं तर अतिशयोक्तीचे
    ठरु नये.काही लोकांची जीवनगाथाच खर तर अत्यंत दुःखदायी
    असते.अनंत दुःख भोगून संकटाचा सामना करुन व संघर्षाच्या
    मार्गावरुन वाटचाल करीत त्यांनी हा दुःखाचा प्रवास खडतर तपश्चर्या
    करुन सुकर बनविलेला असतो.मात्र त्यासाठी त्यांना करावा लागलेला
    संकटाचा सामना,भोगावे लागलेले दुःख हे कुणीच विचारात घेत
    नाहीत.आज जागतिक महिला दिन!त्यानिमित आम्ही येथे आपणांस अशाच एका संघर्षशोल कर्तृत्ववान महिलेचा कार्यपरिचय करुन देत आहोत.चुल आणि मुल हि संकल्पना मोडीत काढून आज संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या कर्तबगारीचा हा अल्पसा परिचय….नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव शेजारील व-हाणे या छोटयाशा गावी श्रीमती आशाताई बच्छाव यांचा सन १९७६ साली गरीब व सामान्य कुटूंबात जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले.पुढे उच्च शिक्षण घेण्यापुर्वीच त्यांचा लहानपणीच बालविवाह उरकवून टाकण्यात आला.त्या काळातील बुरसटलेल्या व जुन्या विचारसरणीमुळे आशाताईना आपले शिक्षणाचे स्वप्न अर्ध्यावरच सोडावे लागले.व बालवयातच संसाराचे जोखड माथ्यावर घ्यावे लागले.आईवडिलांच्या अट्टाहासामुळे केवळ खेळण्या बागडण्याच्या दिवसात म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षी आशाताईचे लग्न हे सख्ख्या मामाच्या मुलासमवेत लावून देण्यात आले.सासरी आल्यानंतर घरातील अठरा विश्व दारिद्रय आणि सासरी असलेली गरीबीची परिस्थिती बघून व नवरा एक मजूर म्हणून करीत असलेले काम बघून आशाताईना अत्यंत वेदना व दुःख झाले.मनी बाळगलेले स्वप्नांचा पुरता चुराडा झालेला होता.मात्र अशाही परिस्थितीत शेवटी आशाताईनी कसे बसे संसारात मन रमवून आपला गरीबीचा संसार सुखाचा करण्याचा अतोनात प्रयत्न केला.त्याच काळात आशाताईच्या उदरी दोन अपत्यांनी अर्थातच पुत्ररत्नांनी जन्म घेतल्याने त्यांचे जीवन जगण्यचा मार्ग सोपा व सुकर झाला.जन्माला आलेल्या अपत्यांमध्येच भविष्याचे सुख व समाधान शोधत त्यांनी आपला वेदनादायी व संकटाच्या काटेरी वाटेवरील प्रवास सुरुच ठेवला.कसे तरी कुतरओढ करीत संसाराचा गाढा चालवित असतानाच,आशाताईना मात्र वाचन व लिखाणाची असलेली आवड शांत बसू देत नव्हती.त्या सदैव काहीना काही तरी वाचत राहिल्या,लिहित राहिल्या.घरातील चुल आणि मुल हे सांभाळता सांभाळताच लोकांच्या शेतात मोलमजुरीचे कामे करण्याबरोबरच त्यांनी आपले वाचन व लेखन सुरुच ठेवले.आणि म्हणूनच सन २००५ साली आशाताई या “युवा मराठा”वृतपत्रांच्या एक महिला व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत झाल्या.युवा मराठा मध्ये काम करीत असतानाच त्यांनी राज्यस्तरीय वृतपत्र सत्यवार्ता,पोलिस नजर,कोल्हापूर विशेष या वृतपत्रांसाठी देखील महिला पत्रकार म्हणून मोठया उत्साहाने व नाविण्यपुर्ण उल्लेखनीय कामकाज केले.थोडे सुखाचे दिवस येत असतानाच व पत्रकारिता क्षेत्रामुळे नावलौकिक होत असतानाच आशाताईवर मोठाच दुःखाचा डोंगर कोसळला.त्यांचे घरातील कर्ता व्यक्ती म्हणजे अर्थात त्यांचे पतीचे सन २००९ साली अपघातात दुर्दैवाने निधन झाले.आणि मग खरे अर्थाने आशाताईच्या जीवनात दुःख ,वेदना,संकटाची जणू मालिकाच सुरु झाली.पदरी असलेली दोन लहानशी अपत्य! पतीचे झालेले अकाली निधन.आणि ऐन तारुण्यात आशाताईच्या वाटयाला आलेले वैधव्याचे जीणं या सगळ्या संकटाचा सामना करीत असतानाच आशाताई अक्षरशः मेटाकुटीस आल्या.खुपच दुःख भोगलीत.अनंत अडचणीचा सामना केला.पण सुखाला जसे सोबती असतात तसे दुःखाला सोबत कुणीही नसते याचा पावलोपावली अनुभव आशाताईनी घेतला.सगेसोयरे,नातेवाईक आप्तेष्ट म्हणवून घेणारेही या दुःखात पाठ दाखवून ओळखेनासे झालेत.परक्यासारखी वागून या संकटाच्या काळात आशाताईना सहानुभूती किंवा आपुलकी न दाखविता तिरस्काराने वागत राहिलेत.आणि मग आशाताईनी अत्यंत कष्टाने व संघर्षातून वाटचाल आपल्या जीवन जगण्यासाठी पत्रकारिता हेच क्षेत्र निवडले.एक महिला पत्रकार म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्यातला स्वाभिमान कधीच गमावला नाही.निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहून कार्य करीत राहिल्या.त्यामुळेच आज त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचले.जिद्द,हिंमत आणि आत्मविश्वास या त्रिसुत्रीवर त्यांचा अतोनात विश्वास असल्यानेच आज त्या पत्रकारिता क्षेत्रामुळे नावलौकीकास प्राप्त झाल्यात.एक महिलाही काय करु शकते,याचे आशाताई बच्छाव म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहेत.पतीच्या निधनानंतर एखाद्या पुरुषासारखे स्वतः खंबीर होऊन मोठा त्याग करुन मुलांसाठी लढत राहिल्या,जीवन कसे जगायचे याचा अनुभव घेऊन खुप शिकल्या आणि आज स्वबळावर स्वत व मुलांना समाजात ताठ मानेने जीवन जगायला उभे केले.आणि मग अशा काळात दुर गेलेले नातेवाईक सगेसोयरे आप्तेष्ट आता सर्वच आशाताईच्या जवळ यायला लागलेत व मानसन्मानाची वागणूक द्यायला लागलेत.तर हि सगळी करामत फक्त त्यांनी निवडलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील कर्तबगारीमुळेच घडली असे म्हटले तर वावगे काहीत ठरणार आहे.आशाताई बच्छाव आज युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलच्या महाराष्ट्र राज्याच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत आहेत.तर लवकरच स्थापन होत असलेल्या राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत.आशाताईच्या कार्याचा यथोचीत सन्मान म्हणून गत दोन वर्षापुर्वी मालेगांवच्या तत्कालीन तहासीलदार सौ,ज्योती देवरे यांनी आशाताईना जागतिक महिला दिनानिमित सन्मानीत करुन गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता.अशा या संघर्षशील आदर्शवादी महिला संपादक श्रीमती आशाताईच्या कार्याला मानाचा सलाम!! – लेखन शब्दांकन- सौ. निर्मला मोहन शिंदे ,कोल्हापूर