चुकल का ? बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे

     

    पुणे: पिंपरी चिंचवड शहर तसे औद्योगिक क्षेत्रात विकसित झालेले रहिवाशी शहर आहे.
    त्यामुळे महापालिकेतील प्रत्येक पद सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांना महत्वाचे असते.यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणूक वरून झालेला भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे आणि शहर भाजपा मधील राजकीय वाद झाला असा समज निर्माण झाला असला तरी या शहरात सध्या ४० वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ असलेले स्व.अंकुश लांडगे आणि पिंपरी चिंचवड शहरात सत्तेत आलेल्या भाजपचे भोसरीचे बिनविरोध पहिले नगरसेवक रवी लांडगे यांनी केलेल्या फ्लेक्स बाजी वरून पुन्हा हा वाद बाहेर आला आहे असेच दिसून येत आहे.
    स्थायी समितीच्या बैठकीत रवी लांडगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते मात्र अचानकपणे नितीन लांडगे यांचे नाव जाहीर करण्यात आले त्यामुळे रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समितीच्या सदस्याचा राजीनामा देऊन टाकला त्यामुळे भाजपचे राजकारण गरमागरम झाले हे दिसूनही आले.कारण परिसरातील प्रत्येक फ्लेक्स वर वर हॅश टॅग चा वापर देखील करण्यात आला आहे. यामुळे शहरातील भाजप बद्दल कार्यकर्त्यांच्या मनात मोठी समस्या निर्माण झाली आहे असे काही प्रमाणात भोसरीतील नागरिकांना वाटू लागले आहे.
    एकीकडे रवी लांडगे यांना शब्द दिला असला तरी न पाळता समतोल कसा राखून राजकीय वातावरण कसे निर्माण करायचे याचे प्रामुख्याने भाजप नेते पिंपरी चिंचवड मधून काम करीत आहेत.
    रवी लांडगे यांना राजकीय वारसा त्यांच्या चुलते भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.अंकुश लांडगे यांच्या मुळे लाभला असला तरी त्यांचा भोसरीच्या विधानसभा परिसरात दांडगा संपर्क आहे हे सगळ्यांना माहीत आहे .
    यापूर्वीच भोसरीच्या राजकीय आखाड्यात माजी आमदार विलास लांडे,आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे विधानसभा मधील किस्से आजही चर्चेत आहेत.
    पण आता पुन्हा आमदार महेश लांडगे यांनी अजून एकाची नाराजी ओढवून घेऊन त्यांना फायद्याचे ठरणार आहे का हे येणारा दिवस ठरवेल मात्र भोसरीच्या राजकारणातील बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले असल्याने पक्षाने उमेदवारी दिली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.जर रवी लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेने गेले तर नक्कीच पक्षाला आणि कार्यकर्त्यांच्या फायद्याचे ठरणार आहे कारण भोसरी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होणार अशी चर्चा भोसरीच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
    मात्र भोसरीच्या प्रत्येक नागरिकांचे लक्ष ‘चूकल का?’या फ्लेक्स वरील शब्दाला पाहिल्या शिवाय पुढे जात नाही हे तितकेच खरे आहे.
    त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते देणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    वडगांव न्युज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी, पुणे.