शिक्षण विभाग माध्यमिकने घेतली दुसऱ्या वर्षी ही (NMMS) एन.एम.एम.एस.सराव चाचणी
कोल्हापूर /(प्रतिनिधी):-कोल्हापूर शिक्षण विभाग गुणवत्तेमध्ये नेहमीच राज्यात अग्रेसर आहे. त्याचे कारण म्हणजे गुणवत्तेची कास धरून काम करणारे शिक्षक ,मुख्याध्यापक, आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रशासन.
गेली दोन वर्षे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना भरघोष यश मिळावे व जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता धारक व्हावे या साठी शिक्षण विभाग (माध्यमिक) सराव चाचणीचे नियोजन करत आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन व कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे यांच्या प्रेरणेतून, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली, श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजीचे अध्यक्ष तसेच नामांकित उद्योजक कस्तुरे त्यांचे सहकारी टारे यांच्या दातृत्वातून, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, विस्ताराधिकारी धनाजी पाटील,श्रीमती जयश्री जाधव यांच्या प्रयत्नातून व उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे ,उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, विस्तराधिकारी विश्वास सुतार, डी. सी. कुंभार श्रीमती रत्नप्रभा दबडे यांच्या सहकार्यातून दिनांक 14 डिसेंबर रोजी NMMS सराव चाचणीचे नियोजन करण्यात आले होते.
सदर परीक्षेला जिल्ह्यातील ७२ केंद्रातून २७६३४ विद्यार्थी बसले होते. अंतिम परीक्षेच्या धरतीवर घेतली आहे. या चाचणीचे पेपर काढण्याचे काम व्यंकटराव हाय इचलकरंजीचे प्रवीण आंबोळे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.आर. पाटील,अन्सारी मुख्याध्यापक नॅशनल हायस्कूल इचलकरंजी, आत्तार अध्यापक नेहरू हायस्कूल कोल्हापूर, राहुल नवकुडकर मुख्याध्यापक जयप्रभा हायस्कूलजयसिंगपूर यांनी केले .अशाच प्रकारचे उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत सर्वांगाने अव्वल राहण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग नक्कीच कटिबद्ध राहील. अशी माहिती प्रसिद्धीस उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी दिली.