Home कोल्हापूर जिल्हा वारणेच्या कुस्ती मैदानात पै.सिकंदर शेख याने जनसुराज्य शक्ती केसरी किताब पटकावला

वारणेच्या कुस्ती मैदानात पै.सिकंदर शेख याने जनसुराज्य शक्ती केसरी किताब पटकावला

वारणेच्या कुस्ती मैदानात पै.सिकंदर शेख याने जनसुराज्य शक्ती केसरी किताब पटकावला

 

 

 

वारणानगर,(प्रकाश कांबळे):-सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 30 व्या पुण्यस्मरणार्थ झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या अत्यंत चुरशीच्या अटितटीच्या झालेल्या लढतीत भारताचा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याने विजय मिळवत या मल्लयुध्दातील अव्वल क्रमांकाचा जनसुराज्य शक्ती श्री 2024केसरी किताब पटकावला.

या लक्षवेधी ठरलेल्या कुस्तीत इजिप्तचा जागतिक विजेता पैलवान अहमद तौफिक यानेही आपले डाव-प्रतिडाव मारत दमदार चढाई केली पण अखेरच्या क्षणी सिकंदर शेख यांनी मच्छी पकड मारत अहमद तौफिक चितपट केले विजेत्या पै सिकंदर शेख यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक डॉ विनय कोरे यांच्या हस्ते व युवा नेते विश्वेश कोरे, आमदार अशोक माने, समित कदम, करणसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह रोख रक्कम देऊन जनसुराज्य शक्ती श्री केसरी किताब प्रदान करण्यात आला.

या वर्षीच्या मैदानात प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती केसरी किताबाची महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख आणि इजिप्त चा जागतिक विजेता पैलवान अहमद तौफिक यांच्यात झालेल्या खडाखडी कुस्तीत झाली. वारणेच्या मैदानात या वर्षीच्या जनसुराज्य शक्ती या किताबाचा मानकरी पैलवान सिकंदर शेख ठरला.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने जागतिक विजेता इजिप्त पैलवान सल्लादिन अब्बास वर विजय मिळवत पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी नागपट्टी डावावर वारणा साखर केसरी किताब पटकावला.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समुह आयोजित भव्य विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्रामात भारत विरुद्ध इजिप्त आंतरराष्ट्रीय नामवंत मल्लांच्या सह प्रमुख ३५ कुस्त्यांसह तीनशेहून अधिक चटकदार कुस्त्या या मैदानात झाल्या या कुस्ती मैदानाचे पूजन युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख कुस्त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास सुरुवात झाली.रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत कुस्त्या चालल्या होत्या.

वारणा दुध साखर वाहतूक सहकारी संस्था शक्ती या किताबासाठीची लढत पुणे राष्ट्रीय विजेता पैलवान दादा शेळके आणि हरियाणा राष्ट्रीय विजेता पैलवान मंजीत खात्री यांच्यात गिस्सा डाव टाकत खत्री यास अस्मान दाखवले आणि वारणा दुध साखर वाहतूक केसरी शक्तीश्री दादा शेळके यांनी किताब पटकावला.

वारणा दूध संघामार्फत पुरस्कृत केलेली पै. शैलेश शेटे विरुद्ध आंतरराष्ट्रीय मछवाडा आखाड्याचा पंजाब हिंदकेसरी पै. भूपेंद्र यांच्यात झालेल्या कुस्तीत पै. भूपेंद्र विजय मिळवला. व वारणा दुध संघशक्ती केसरी किताब पटकावला.

वारणा ऊस वाहतूक संस्थेने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय विजेता पुणे चा पै. रवी चव्हाण आणि दिल्लीचा पै. प्रवीण जहर यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या कुस्तीत रवी चव्हाण ने जुळी डाव टाकत प्रवीण जहर ला चितपट केले.

वारणा सहकारी बँकेने पुरस्कृत केलेल्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर आणि दिल्ली आखाड्याचा पै. दिनेश गुलीया यांच्यात झालेल्या लढतीत गुणावर दिनेश गुलीया याने एकेरी डावावर विजय मिळवला.

वारणा बिल्ट्यूब इंडस्ट्रीज कंपनीने पुरस्कृत केलेल्या कर्नाटक केसरी पै. कार्तिक काटे आणि राष्ट्रीय विजेता दिल्लीचा चा पै भाटिया यांच्यात झालेल्या अटितटीच्या लढतीत जॉन भाटिया विजय झाला.

वारणा विभाग शिक्षण मंडळाने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय विजेता सांगलीचा पै. संदीप मोठे आणि पंजाबचा राष्ट्रीय विजेता पै पवन कुमार यांच्यात झालेल्या लढतीत पै. व पै. यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.

वारणा बझार ने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय विजेता पै समीर शेख आणि राष्ट्रीय विजेता मुन्ना यांच्यात झालेल्या लढतीत समीर शेख यांनी विजय मिळवला.

स्वर्गीय तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कारासाठी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या शाहूवाडी तालुक्यातील शिंपी गावचा पै. हरी नामदेव पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार या मैदानात आमदार डॉ विनय कोरे हस्ते प्रदान करण्यात आला.

या कुस्ती मैदानात कुस्त्या पाहण्यासाठो कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय आमदार अशोक माने, युवानेते,विश्वेश कोरे, कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळा प्रांत अधिकारी समीर शिंगटे ,समित कदम , कर्णसिंह गायकवाड, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील,कार्यकारी संचालक एस आर भगत, आदीसह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी उपस्थित होते.या कुस्ती मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व इतरही राज्यातील कुस्ती प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सपोनि रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर पोलीसांनी चोख बंदोबस्त बजावला होता.

कुस्त्यांचे समालोचन व निवेदन ईश्वरा पाटील,जीवनकुमार शिंदे यांनी केले तर आभार वस्ताद संदीप पाटील यांनी मानले.