अंबप मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात अंबपवाडीची पूजा पाटील, पुरुष गटात सांगलीचा सुमंत राजभर प्रथम 

    अंबप मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात अंबपवाडीची पूजा पाटील, पुरुष गटात सांगलीचा सुमंत राजभर प्रथम

     

    टोप /(वार्ताहर):- अंबप (ता.हातकणंगले) येथे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे व स्वर्गीय खा. बाळासाहेब माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ व जनता कुकट पालन,पशुखाद्य निर्मिती सहकारी संस्था यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष खुल्या गटात सांगली च्या सुमंत राजभर तर महिला गटात अंबपवाडी च्या पुजा पाटील ने प्रथम क्रमांक पटकविला. बक्षीस वितरण आमदार डॉ. विनयरावजी कोरे,आमदार डॉ. अशोकराव माने,जनसुराज्यचे प्रदेशअध्यक्ष समित कदम, संस्थाध्यक्ष व के डी सी सी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले.

    मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते व विकासराव माने, राजेंद्र माने,वाय.आर.पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.यावेळी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा सहकाराचा वारसा विविध उपक्रमांच्या माध्यमातून माने बंधूनी जपला आहॆ.विकासाचे विधायक कार्य कौतुकास्पद असल्याचे आ. विनय कोरे यांनी सांगितले.या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून अंबप सारख्या ग्रामीण भागातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडले आहॆत.त्यामुळे क्रीडा चळवळ बळकट करण्यासाठी नेहमी

    अग्रस्थानी राहू असे विजयसिह माने यांनी सांगितले. या स्पर्धा सलग 29 वर्षे झाले घेतल्या जातात.

     

    स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

    पुरुष खुलागट 10 किमी -प्रथम सुमंत राजभर,द्वितीय कुमार मदने, तृतीय अनिकेत देशमुख सर्व सांगली, महिला खुला गट 5 कि.मी प्रथम पूजा पाटील अंबपवाडी, द्वितीय सानिका नलवडे अंबप,तृतीय अंजली निकम व्हन्नूर

    मुले 8 वी ते 10वी 3की.मी

    प्रथम विपुल गरंडे वडगाव,

    द्वितीय निखिल नवाळे व्हन्नूर,

    तृतीय दिग्विजय पाटील पेठवडगाव,

    मुली 8 वी ते 10 वी 2 की.मी,

    प्रथम मेरी चौगुले व्हन्नूर,

    द्वितीय वेदिका पाटील पेठवडगाव,

    तृतीय नीरजा कदम तळसंदे,

    मुले 5वी ते 7वी 2 की. मी.

    प्रथम आरव शेलार अंबप,

    द्वितीय प्रज्वल शेंडगे वारणा,

    तृतीय दिपराज नलवडे वारणा,

    मुली 5वी ते 7वी 1 की. मी.

    प्रथम श्रीया संकपाळ व्हन्नूर,

    द्वितीय अवंती निकम सातवे,

    तृतीय वेदिका यादव सातवे, यांनी क्रमांक पटकाविले.

    यावेळी कार्यक्रमास रवींद्र जाधव, दादासाहेब लाड, शरद बेनाडे, राजेंद्र माने, विश्वनाथ पाटील, डी के माने, डॉ. निलेश चौगुले, संतोष पाटील, सुहास राजमाने यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.स्वागत एस. वाय. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विनायक गुरव यांनी केले.आभार सुधीर माने यांनी मानले.