कुंभोज बाहुबली रोडवर वाहतूकिची समस्या

    कुंभोज बाहुबली रोडवर वाहतूकिची समस्या

     

    कुंभोज :  येथील वाहतुकीची समस्या कायमच भेडसावत असून कुंभोज बाहुबली रोडवर असणाऱ्या जिल्हा बँकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी सध्या अनेक सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची वाहतूक करणारी वाहने सध्या कुंभोस परिसरात दाखल झाले असून सायंकाळी पाच वाजता सुटणारी मुलांची शाळा यामुळे सदर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीची तारांबळ उडत आहे अनेक वेळा अनेक कार्यकर्त्यांनी कुंभोज बायपासचा प्रश्न उचलून धरला परिणामी काही वेळा तो पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले परिणामी सदर रस्त्याचे काम चालू झाले पण ते निम्म्यातच का थांबले याचे विषयी मात्र उत्तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच माहिती असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. परिणामी बुधवार व रविवार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत असून दररोज सायंकाळी होणारी वाहतुकीच्या या समस्येला नागरिक कंटाळली असून महिला व विद्यार्थी वर्गातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून बायपास रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून तो रस्ता चालू करून सदर वाहने बायपास रस्त्याने बाहेर काढावीत अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातून होत आहे.विनोद शिंगे