16 हजाराची लाच घेताना बीट अंमलदार रवी शिंदे लाचलुचपत च्या जाळ्यात
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-हातकणंगले पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. हवालदार रविकांत शिंदे यांना 16 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं असून हे कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून करण्यात आली आहे.
माहितीनुसार, शिंदे यांनी गुटखा विक्रीसाठी महिन्याला ४,००० रुपये देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर चार महिन्यांचे पैसे एकत्र करून तक्रारदाराने १६,००० रुपये दिले, याच वेळी लाचलुचपत विभागाने धाड टाकून शिंदे यांना जेरबंद केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हवालदारावर लाच घेण्याचे गंभीर आरोप असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, या कारवाईने पोलिस दलातील इतर कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.