कुटवाडचे नृसिंह पथक ठरले महायुती विजय संकल्प दहीहंडीचे मानकरी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कुटवाडचे नृसिंह पथक ठरले महायुती विजय संकल्प दहीहंडीचे मानकरी

     

     

    पेठ वडगाव : दलितमित्र डॉ.अशोकराव माने पुरस्कृत महायुतीची विजय संकल्प दहीहंडी कुटवाडचे नृसिंह मंडळ मानकरी. सव्वालाखांच्या बक्षिसासाठी चार तास गोविंदाचा थरार सुरू होता. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालावर तरुणाईनेही थिरकण्याचा आनंद घेतला.
    डॉ.अशोकराव माने पुरस्कृत वडगाव नगरपालिका चौकात १लाख २५ हजार रुपये बक्षीस असणाऱ्या विजय संकल्प दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते, आमदार डॉ.विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिकात्मक दहीहंडी फोडुन उद्घाटन करण्यात आले. अजिंक्यतारा शिरोळ, गोडीविहिर तालीम शिरोळ,जय हनुमान शिरोळ व नृसिंह गोविंदा पथक कुटवाड या संघांनी सलामी दिल्यानंतर सुरवातीला ५१ फुटावर क्रेनद्वारे बांधण्यात आलेली दहीहंडी टप्याटप्याने खाली घेण्यात येऊन सोडतीद्वारे गोविंदा पथकांना संधी देण्यात येत होती. कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने सात थर रचले आणि या पथकातील श्रेयल पाटील या बालगोविंदाने ३२ फुटावरील दहीहंडी फोडत पथकाला सव्वा लाख रुपये बक्षिसाचा मान मिळवुन दिले. विजेत्या नृसिंह गोविंदा पथकाला डॉ.अशोकराव माने व वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,धनंजय टारे, सुहास राजमाने यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव,जि.प.सदस्य अरूणराव इंगवले,डॉ. अशोक चौगुले,विजय भोजे,प्रसाद खोबरे, रमेश शिंपणेकर, वारणा दूध संचालक अरुण पाटील, दीपक पाटील,एन.आर. पाटील,मार्केट कमिटी माजी अध्यक्ष अमरसिंह माने,राजाराम चे माजी चेअरमन दिलीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुरेश पाटील,शिवसेना शहराअध्यक्ष अक्षय मदने ,राजेंद्र जाधव, आप्पा माने, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अभयसिंह यादव यांनी केले.पंच म्हणून भिकाजी माने,सरदार खाटीक, जगनाथ माने,गणपती यादव यांनी पाहिले आभार संतोष माळी यांनी मानले.

    Advertisements

    याप्रसंगी बोलताना आमदार विनय कोरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव होऊनही पाच वर्षात अखंडपणे जनतेत राहून काम केलेल्या डॉ.अशोकराव माने यांच्यामागे आशीर्वादाचे बळ उभा करत आमदारकीची संधी द्यावी. या संधीचे सोने करण्यात ते कुठेही मागे पडणार नाहीत याची ग्वाही देत असल्याचे सांगितले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements