विश्ववारणाचा स्वराज रुपेश कदम याची धनुर्विद्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    विश्ववारणाचा स्वराज रुपेश कदम याची धनुर्विद्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

     

     

    नवे पारगांव : तळसंदे,(ता.हातकणंगले) येथील विश्ववारणा पब्लीक स्कुल & ज्युनि.कॉलेजचा विद्यार्थी स्वराज रूपेश कदम याने शासकीय शालेय १४ वर्षाखालील जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी सातारा येथे त्याची निवड झाली
    नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण ४८ खेळाडू सहभागी झाले होते.स्वराज कदम यांने यावेळी एकूण बारा राऊंड मध्ये ३०० गुण मिळवून प्रथम कमांक मिळवला.सदरच्या स्पर्धा या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांचे नियोजनाखाली पार पडल्या
    स्वराज यास संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके,सचिव डी पी पाटील, व्यवस्थापक व मुख्याध्यापक दीपक महाडिक,संचालिका व्ही.डी.पाटील,डॉ. दिपीका महाडीक यांचे प्रोत्साहन तर जिमखाना प्रमुख प्रा संभाजी पाटील,प्रशिक्षक मुकेश खिल्लारी,सागर सुतार यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements