Home कोल्हापूर जिल्हा शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक...

शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय

 

कोल्हापूर / (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात विनाअनुदानीत शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेली ३४ दिवस विविध प्रकारचे आंदोलने सुरु आहेत. मात्र अद्यापी राज्य शासनाने आश्वासन देऊन सुद्धा अनुदानाचा टप्पा वाढीचा आदेश काढलेला नाही. कोल्हापूरात शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर सद्या खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्या सर्वांची प्रकृती खालावत चालली आहे. पुढील टप्पा वाढीचा आदेश शासनाने तात्काळ काढावा या मागणीसाठी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने गुरुवार दि.५ सप्टेबर शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक, खाजगी प्राथमिक, महापालिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथील सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Advertisements

या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठातंर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ यासह जिल्हयातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत. रस्ता रोको आंदोलन सकाळी ११ वाजता होणार असल्याने सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड,बाबा पाटील, सुधाकर निर्मळे,राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संतोष आयरे, के. के. पाटील, उदय पाटील, भरत रसाळे, गजानन काटकर, सुनिल कल्याणी, अजित रणदिवे, श्रीधर गोंधळी, शिवाजी भोसले, रणजित सदामते आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements