Home Breaking News पेठवडगावात महायुतीची सव्वा लाखाची दहीहंडी

पेठवडगावात महायुतीची सव्वा लाखाची दहीहंडी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

पेठवडगावात महायुतीची सव्वा लाखाची दहीहंडी

 

 

 

पेठ वडगाव / येथील वडगाव नगरपालिका चौक येथे दलितमित्र डॉ.अशोकराव माने बापूप्रेमी पुरस्कृत महायुतीच्यावतीने विजय संकल्प 2024 दहीहंडी दि.03 सप्टेबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केली असल्याची माहिती भाजपाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली.

Advertisements

 

या कार्यक्रमास जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडीक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ.विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडीक, माजी आम.सुरेश हाळवणकर, माजी आम.अमल महाडीक, युवा नेते जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने, युवा नेते माजी जि.प.सदस्य राहुल आवाडे,जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने आदी उपस्थित राहणार आहेत. वडगाव शहरातील तालीम मंडळांच्या जुन्या काळातील गोविंदांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेना शिंदे गट वडगाव शहराध्यक्ष अक्षय मदने, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन चव्हाण, भाजपा वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अरुणदादा पाटील, ताराराणी आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements