चावराई माध्यमिक विद्यालयात गुणगौरव व हस्तलिखीत प्रकाशन सोहळा संपन्न 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    चावराई माध्यमिक विद्यालयात गुणगौरव व हस्तलिखीत प्रकाशन सोहळा संपन्न

     

     

    नवे पारगाव, ता.१: “प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्यातील सुप्त गुण ओळखून आपण आपली ध्येय गाठू शकतो”. असे प्रतिपादन तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण समुहाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांनी चावरे (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले.

    Advertisements

    चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व हस्तलिखीत प्रकाशन प्रसंगी सौ. पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पाटील होते.

    विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविकात शाळेतील उपक्रमांचा आढावा घेतला. कु. रिया सुरेश पाटील हिने मनोगत व्यक्त केले.

    यावेळी सौ. पाटील यांच्या हस्ते ‘ चावराई हस्तलिखीता’चे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षेतील यशवंताना पारितोषिक देण्यात आली.

    यावेळी अध्यापक श्रीमती ए. व्ही. वळगड्डे,सी. एस. पाटील, जे. एस. कुंभार, एस. ए. पाटील, ए. वाय. पाटील, एन. व्ही. बिडकर, एम. एस. धोंगडे, डी. ए. पाटील, सुरज पाटील, डी. पी. कुंभार उपस्थित होते. ए. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ए. व्ही. वळगड्डे यांनी आभार मानले.

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements