पाराशर शैक्षणिक संकुलात महावाचन उत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
नवे पारगाव : विद्यार्थी जीवनापासून वाचनाची सवय शरिराला जडल्यास जीवनात कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही,हे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्यास जीवनातील अनेक अडथळे आपोआप निघून जातील,असे मत पाराशर शिक्षण संकुलाचे प्राचार्य एन.आर.यादव यांनी पाराशर हायस्कूल नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथे आयोजीत महावाचन उत्सव कार्याक्रमात व्यक्त केले.अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन कमिटिचे सदस्य,श्री पाराशर शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य एन.आर.यादव,पर्यवेक्षका एस. एस.रोकडे,बी.जी.करवडे,बी.एस.मोरे, आर.एस.बागडी,ओ.एन.कुंभार,साधना चरणे,दिपक यादव,ग्रंथपाल विजय जाधव आदी उपस्थित होते.
या वेळी महावाचन उत्सवा प्रसंगी सर्वांचे स्वागत करत प्रास्तविकातुन ग्रंथपाल विजय जाधव यांनी’वाचाल तर वाचाल,वाचनाचे महत्त्व,वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रम याची जाणीव करून विद्यार्थी विद्यार्थिनी दिली.पर्यवेक्षिका एस एस रोकडे यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले,बी जी करवडे यांनी वाचन प्रतिज्ञा घेतली, महादेवी कुंभार हिने शिक्षणमहर्षी डॉ.बापुजी साळुंखे यांचे व्यक्ती आणि कार्य या पुस्तकाचे वाचन केले.यावेळी शिक्षक,शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.