भाजपा कोल्हापूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी पाटील यांची निवड
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात निवडीचे पत्र दिले . यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणविस ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय महाडीक , प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, समन्वयक राहुल चिकोडे , अलकेश कांदळकर,यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली .
गेली २७ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम पाटील करीत असुन भाजपाशी ते सातत्याने एकनिष्ठ आहेत केल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली दरम्यान पाटील यांचे मुंबईहुन गारगोटी त आज दि.२२ रोजी आगमन होणार असुन त्यांचे तालूक्यात जल्लोषी स्वागत होणार असल्याची माहिती प्रदेश युवा सचिव अल्केश कांदळकर यांनी दिली.