कुंभोज येथे गणेश मंदिर शिखर बांधकामाचा शुभारंभ

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कुंभोज येथे गणेश मंदिर शिखर बांधकामाचा शुभारंभ

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथे गणेश मंदिराच्या शिखराच्या बांधकामाचा शुभारंभ आज कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे माजी मॅनेजर संजय जाधव व परिवाराच्या वतीने करण्यात आला.

    Advertisements

    गेल्या अनेक वर्षापासून हनुमान मंदिराची बांधकाम झाली होती परंतु शिखर व अन्य कामासाठी हे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने काही नागरिकांनी यामध्ये लक्ष घालून सदर मंदिर पूर्ण करण्याचा निर्धार केला त्या अनुषंगाने आज कुंभोज परिसरातील नागरिक व मान्यवरांच्या वतीने सदर मंदिराचा कलश बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. या मंदिर बांधकामासाठी जवळजवळ दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून लोकप्रतिनिधी व गावातील मान्यवर मंडळींनी सदर मंदिर बांधकामासाठी सहकार्य करण्याचे आव्हान सुरत युवक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब हराळे, महाविकास आघाडीचे घटनेचे किरण माळी ,अजित कळत्रे, रावसाहेब तोरसकर यांनी केले आहे .

    या कार्यक्रमामध्ये जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईचेरमन बाबासाहेब चौगुले, शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, कर्मवीर पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे , छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर,सरपंच सौ स्मिता चौगुले ,उपसरपंच अशोक आरगे ,महाविकास आघाडीचे घटनेचे किरण माळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, सदाशिव महापुरे दावीद घाटगे, निवास माने, मनोज वाईकर ,तेजस कोळी सागर सुवासे , वडगाव बाजार समितीचे संचालक चांद मुजावर, दीपक पवार,अनिकेत चौगुले,किरण नामें, सुर्यकांत सपकाळ, दिपक वाईकर,श्रीकांत माळी ,ग्रामपंचायत माजी सरपंच जयश्री जाधव,सुनीता वाईकर,रविराज जाधव ,राजू सुतार, अजित कंळत्रे, रावसाहेब तोरस्कर ,ऋतुराज तोरस्कर,बी जे पाटील,महेश माळी, बाळासाहेब लाटवडे,तसेच सूर्योदय युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements