जि.प.शाळांच्या सुधारणेसाठी गटशिक्षणाधिकारी यांना प्रहार कडून निवेदन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    जि.प.शाळांच्या सुधारणेसाठी गटशिक्षणाधिकारी यांना प्रहार कडून निवेदन…

    पडक्या भिंती, गळकी छते आदी समस्या निर्वारण व इतर पायाभूत सुविधांची मागणी…

    Advertisements

     

    हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे): हातकणंगले शहरात विद्यार्थी संख्या मोठी असून यातील मोठा वर्ग जि.प. शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व अंगणवाडी इ. शाळा शहरातील मध्यवस्तीत पाच तीकटी येथे असून सद्यस्थितीत या शाळांमध्ये मोठी दुरावस्था असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना निदर्शनास आणण्यात आले. कक्ष अधिकारी श्री.मुरमुरे यांच्याकडे सदर प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली.

     

    जि.प.शाळांची दयनीय अवस्था असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी आहे. विद्यार्थी याठिकाणी कन्या विद्या मंदिर शाळेतील पडलेले वर्ग नव्याने बांधून मिळण्याची प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येच्या मानाने मुलींसाठी स्वच्छतागृहाची कमतरता भासत असून नवीन स्वच्छता गृह बांधण्याची मागणीही यातून केली आहे. याचबरोबर शाळेच्या सुरक्षेसाठी तटरक्षक भिंतीची उंची वाढवणे, प्रशस्त सी.सी.टीव्ही कॅमेरे ची सुविधा (किमान ८ ते १०), पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर व हॅन्डवॉश स्टेशन, मुबलक वीज पुरवठा व त्याचा खर्च, स्वच्छतागृहाची दैनंदिन साफसफाई, विद्यार्थ्यांना मुबलक पाठ्यपुस्तके, बसण्यासाठी बॅचेस व खेळ सामग्री, डिजिटल शिक्षणसाठी वर्गनिहाय LED टीव्ही आणि शाळेचे रंगकाम,डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

     

    शाळेतील भौतिक सुविधांचा मोठा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप होत आहे. तसेच सदर सर्व समस्यां त्वरित निवारण करणे खूप गरजेचे आहे. तरी शिक्षण विभागाने याकडे विशेष लक्ष घालून वरील सर्व प्रश्न त्वरित निकाली काढावेत. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवक अध्यक्ष अनिस मुजावर यांनी दिलेला आहे. यावेळी प्रहार संघटनेचे महिला शहर प्रमुख सौ. संमती टोपन्नावर, तानाजी चोपडे, मिलिंद प्रभू, अल्लानूर मुल्लानी, मेहमूद मुजावर, इम्रान मुजावर, शिवसेना (उ.बा.ठा) शहर उपप्रमुख अर्जुन जाधव, शेतकरी संघटनेचे बाहुबली बमन्नावर आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements