रस्ता नाही तर टोल नाही; किणी टोलनाक्यावर काँग्रेस चे आंदोलन
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- कोल्हापूर तै पुणे महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने काँग्रेस पक्षाच्यावतीने ‘रस्ता नाही तर टोल नाही’ आंदोलन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोल नाका येथे करण्यात आले. काँग्रेस नेत्यांच्या मागणीची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहापदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलच्या रक्कमेत 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेत आणखी 25 टक्के कपात करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करू अशी हमी दिली. हे काँग्रेसच्या आंदोलनाचे यश असले तरी रस्त्याच्या कामात सुधारणा होईपर्यंत आपला पाठपुरावा राहणार आहे.
दरम्यान सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनेक वाहने टोल शिवाय सोडली. तसेच आक्रमक भुमिका घेत काही काळ महामार्ग ठप्प केला.
आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष ,आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतूराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, सांगलीच्या जयश्री पाटील, राहुल पाटील, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सचिन चव्हाण, संजय कांबळे, राहुल खंजिरे, भगवानराव जाधव, भारती पोवार, शशिकांत खवरे, उत्तम पाटील, अभिजित गायकवाड, बाजीराव सातपुते, उत्तम सावंत, कपिल पाटील, सचिन चव्हाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.