शिवाई संघटने कडून पूरग्रस्तांना जिवनाआवश्यक वस्तूंच वाटप
कोल्हापूर,प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):-गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे राधानगरी धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतं असून पंचगंगा नदी काठच्या गावांना महापूर आला आहे तसेच कोल्हापूर शहरातील काही भागात ही पूरपरिस्थी निर्माण झाली आहे या मध्ये अडकलेल्या कुटुंबाना चित्रदुर्ग मठामध्ये ठेवले आहे तेथील लोकांच्या कुटुंबातील लोकांना व लहान बाळांना कपडे व खाऊ वाटप शिवाई संघटने कडून करण्यात आला.
यावेळी सुनिल कानुरकर,बाजीराव कांबळे,सुनिल नेसरीकर,उदय नागवडेकर,महादेव सुतार, स्वरूपा खुरंदळे,सविता कानुरकर,मनीषा खोत,सुप्रिया गोरे,सागर गुरव,विकास कांबळे, ऋषिकेश पोवार, आदी उपस्थित होते, सामाजिक जबाबदारी म्हणून कोल्हापूर शहरात लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारी ही शिवाई संघटना आहे असे मत पूरग्रस्तांनी व्यक्त केले.