तालुका क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करू- जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    तालुका क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करू- जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ

     

     

    पेठ वडगांव, प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):-हातकणंगले तालुका क्रीडा संकुलासाठी शासन स्तरावर पाठपूरावाकरून क्रीडांगणामुळे तालुक्यातील खेळाडूंची होणारी गैरसोय दूर करू असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ यांनी दिले. त्या पेठ वडगांव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील क्रीडा बैठकीत बोलत होत्या.

    Advertisements

    बैठकीमध्ये खेळाडूंची माहिती भरणे, शाळांना शासनाकडून मिळणा-या विविध योजनांची माहिती,मिळणारे अनुदान , खेळाडूंना मिळणारी शिष्यवृत्ती, जन्म तारीख व ग्रेस गुण निकष ,पंच मानधन इत्यादींची त्यांनी माहिती दिली. तसेच सांघिक व वैयक्तिक स्पर्धा वेळेत पूर्ण करून यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ यांनी केले.

    तर हातकणंगले तालुक्यातून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू चमकतात परंतु तालुक्यात क्रीडा संकुल नाही अशी खंत व्यक्त करून तालुक्यात क्रीडा संकुल तात्काळ होण्यासाठी क्रीडा कार्यालयाने प्रयत्न करावेत अशी मागणी तालुका समन्वयक संताजी भोसले, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, हरिश गायकवाड यांनी बैठकीत केली. तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

    प्रास्ताविक इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर यांनी केले तर सुत्रसंचालन एच आर गायकवाड तर आभार एस व्ही माने यांनी मानले.

    यावेळी सहायक क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, हातकणंगले तालुका क्रीडा अधिकारी अजय देशपांडे,योग प्रशिक्षक समीर कुमठेकर, तालुका समन्वयक शिवाजी पाटील इत्यादीसह तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

     

     

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements