Home कोल्हापूर जिल्हा पुरातत्व विभागाची गडकिल्ल्यावर देखरेख ठेवावी : विशाळगडावरील उद्रेकामुळे लोकसभेत खा.धैर्यशील माने यांची...

पुरातत्व विभागाची गडकिल्ल्यावर देखरेख ठेवावी : विशाळगडावरील उद्रेकामुळे लोकसभेत खा.धैर्यशील माने यांची मागणी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

पुरातत्व विभागाची गडकिल्ल्यावर देखरेख ठेवावी : विशाळगडावरील उद्रेकामुळे लोकसभेत खा.धैर्यशील माने यांची मागणी

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी(विनोद शिंगे):-हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत झालेला उद्रेक सांगत महाराष्ट्रतील गड किल्ले हॆ महाराष्ट्राचे सौंदर्य व भूषण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यावर कोणतीही अतिक्रमणे होऊ नयेत, झालेली अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी करीत केंद्र शासनाने लक्ष देऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची गडकिल्ल्यावर देखरेख ठेवावी अशी मागणी मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत संसदेच्या अधिवेशनात केली.

Advertisements

संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार धैर्यशील माने यांना बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले. यातून सावरण्यासाठी विविध उपयोजना तसेच पूरबाधित क्षेत्राचे संरक्षण देखील होण्याची गरज आहे.यासाठी जागतिक बँकेकडून देण्यात आलेल्या तीन हजार कोटी रुपयांचे पॅकेज बरोबरच केंद्र शासनाने ही वाढीव निधी द्यावा त्यामुळे पूरबाधित क्षेत्राचे संरक्षण देखील होण्याची गरज आहे.अशी मागणी केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून टीका सुरु आहे. या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्रप्रदेश ला जास्त निधी मिळाला असून महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल विरोधी पक्षातील नेते उपस्थित करत आहेत. मात्र खासदार धैर्यशील माने यांनी हा अर्थसंकल्प देशाला पुढे घेऊन जाणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे सांगत सर्वात लहान व कमजोर असणाऱ्या मुलावर आई सर्वाधिक प्रेम करते अस म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

खासदार माने यांनी संसदेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली, अर्थसंकल्प पूर्वीच महाराष्ट्राला केंद्राने ७६ हजार कोटी रुपये दिलेत, आता तर विरोधी पक्ष हारून सुद्धा जल्लोष मध्ये आहे, सत्तेत येण्यासाठी आम्हाला जास्त लोकांपर्यंत जावं लागलं नाही मोदी यांची गॅरंटी चालली आहे म्हणूनच मोदी सरकार आलं आहे. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये तरुण, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या तरतुदी सांगत माने यांनी संसदेतील भाषण गाजवले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements