कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा कुंभोज सावळवाडी पूल वाहतुकीसाठी बंद
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथील कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जोडणारा वारणा नदीवरील पूल ग्रामपंचायत कुंभोज व हातकणंगले पोलीस स्टेशन व ग्रामस्थांच्या सहकार्याने वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यावरती दोन फूट पाणी आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
सदर पुलावरती ग्रामपंचायत कुंभोज हातकणंगले पोलीस स्टेशन यांच्या वतीने बॅरॅकेट्स लावून सदर पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तसेच कोणत्याही नागरिकांनी अथवा मच्छीमाराने वारणा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये मासेमारी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी उतरू नये असे जाहीर आव्हान ग्रामपंचायत कुंभोज व हातकणंगले पोलीस स्टेशन व गाव कामगार पोलिस पाटील महमंद पठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत दळवी तलाठी , हातकणंगले पोलीस स्टेशनचे पदाधिकारी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.