मर्जीना बारगीर हिची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात निवड
खोची,(वार्ताहर):-येथील मर्जीना हैदर बारगीर हिची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली.जिद्द व हिम्मतीच्या जोरावर तिने हे संपादन केले.एका सामान्य कुटुंबातील मर्जीना आपले पोलीस खात्यात करिअर करायचे म्हणून प्रयत्न करीत होते. त्यामध्ये त्याला तिला यश आले.ती खोची येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगी असून तिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.आई गृहिणी म्हणून घर सांभाळते.तर भाऊ रहीम शेती व पशुपालन करतो.तिला पोलीस भरती होण्यासाठी आई व भाऊ यांचे मोठे पाठबळ मिळाले. तिच्या या यशाबद्दल गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.अनेक मान्यवर,ग्रामस्थ यांनी तिच्या निवडीबद्दल सत्कार केला.