Home पर्जन्यवृष्टी संततधार पावसामुळे अंबपमध्ये घर कोसळले 

संततधार पावसामुळे अंबपमध्ये घर कोसळले 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

संततधार पावसामुळे अंबपमध्ये घर कोसळले

 

 

 

नवे पारगाव : अंबप ता.हातकणंगले येथे जोरदार पाऊस आल्यामुळे राजेंद्र कांबळे यांचे घर कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या कुटुंबाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले यात सुमारे तीन लाख रुपयांचे रुपयांचे एकत्रित नुकसान झाले.

Advertisements

अंबप येथील माळकरी गल्लीमध्ये राजेंद्र सखाराम कांबळे यांच्या घरी त्यांची भाची अर्चना कांबळे व त्यांचे कुटबीय राहत होते. वीट बांधकाम केलेलं जुने घर होते गेले पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कांबळे यांचे घर कोसळले. सकाळची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरातच होते. अचानक घराचा आवाज होऊ लागल्याने सर्वजण बाहेर आले. यानंतर काही क्षणातच घर कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे कुटुंबीय भयभीत झाले होते. यामुळे कांबळे कुठूंब बेघर झाले आहे. दुर्दैवाने सदर घटना अगोदर दोन तास घडली असती तर मोठी जीवित हानी झाली असती त्यामुळे कांबळे कुटुंबाच दैव बलवत्तर असच म्हणता येईल. तसेच सरकारी दवाखान्याजवळ शिवाजी माळी यांच्या घराची भिंतीची सुधा पडझड झाली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements