वडगावात भटका मुक्ती आंदोलन वतीने वयोश्री योजनेचे शिबीर ;200 लाभार्थ्यांचे प्रस्ताव
पेठवडगाव : ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यापक लढा उभारून शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे प्रतिपादन भटका मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव साठे यांनी केले.
पेठवडगांव येथे भिमराव साठे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे शिबीर घेण्यात आले. यावेळी दोनशे लाभार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक सचिन परब व अनूराधा कांबळे यांचे मार्फत मंजूरीसाठी सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी वडगावचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर होते.
65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना उपकरण खरेदी करीता एकाचवेळी 3 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर व जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
सचिन परब यांनी योजने विषयी माहीती दिली तर डॉ.स्वप्नील कनवाळे यांनी 65 वर्षानंतर ज्येष्ठांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहीजे याबद्दल मार्गदर्शन केले.