श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ९० वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ९० वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ९० वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी बाहुबली येथे अध्यात्मयोगी चर्याशिरोमणी आचार्य १०८ श्री विशुद्धसागर महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सकाळी विशुद्धसागर महाराज व त्यांच्या संघाचे बाहुबलीच्या प्रवेशद्वारावरती श्रावक व श्राविका यांच्याकडून पादप्रक्षालान करण्यात आले व सवाद्य मिरवणूकणे स्वागत करण्यात आले.

    Advertisements

     

    यावेळी आचार्य १०८ श्री विशुद्धसागर महाराज व त्यांच्या संघाने अनेकांत शोधपीट येथील संरक्षित होत असलेल्या ताम्रपत्र, ताडपत्र व विविध ग्रंथांचे अवलोकन केले. त्यानंतर बाहुबली बृहन्ममूर्ती येथे चरणाभिषेक संपन्न झाले.

     

    श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम विद्यापीठाच्या ९० व्या वर्धापन दिन गौरव समारंभा वेळी आचार्य विशुद्धीसागर महाराज यांनी गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुल शिक्षण प्रणालीचा गौरवास्पद उल्लेख करून गुरुदेवांनी अविष्कृत केलेल्या शील, ज्ञान, प्रेम, सेवा,आणि व्यवस्था या गुरुकुल पंचसूत्रीचा उल्लेख केला. यावेळी झालेल्या आशीर्वाचनात बोलताना ते म्हणाले की, “बाल वर्गातील शिक्षणापासून उच्च महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत संस्कारयुक्त शिक्षण देणाऱ्या या संस्थेस ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. आश्रम व विद्यापीठामार्फत शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक अशी विविध समाज उपयोगी कार्य केले जात आहे व हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

     

    यावेळी बोलताना बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की,”उच्च विद्याविभूषित गुरुदेव समंतभद्र महाराजांनी तत्कालीन परिस्थितीला अनुसरून विविध ठिकाणी गुरुकुल शिक्षण प्रणाली ची स्थापना केली. त्याला अनुसरून काळानुरूप आवश्यक असे त्यांचे कार्य असेच पुढे चालू ठेवले पाहिजे. स्वागत व प्रास्ताविकपर मनोगत संचालक गोमटेश बेडगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मेरी भावनेने झाली.

     

    गुरुकुल स्नातक मंडळाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आले, तसेच निर्माणाधीन नूतन भोजनगृहाच्या आवारात पाचशेच्या वर विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

     

    यावेळी प्रमुख उपस्थित संस्थेचे महामंत्री डी सी पाटील, उभय संस्थांचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, डॉ. बाळासाहेब चोपडे, धनराज बाकलीवाल, सुधाकर मणेरे, बालविकास चे चेअरमन तात्यासो अथणे,डॉ.बी ए शिखरे,बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळाचे अध्यक्ष बालब्रह्मचारी श्रीधर मगदूम अण्णा, उपाध्यक्ष जयकुमार उपाध्ये, सचिव रायचंद हेरवाडे, कोषाध्यक्ष नेमिचंद पाटील, आप्पासाहेब चौगुले, प्रकाश नाईक,अशोक पाटील, मिलिंद अकिवाटे, अध्यापक, अध्यापिका, श्रावक – श्राविका गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नेमिनाथ बाळीकाई यांनी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements