शासनाचा अदुदर्शीपणा व अनास्थेमुळे पिंपळवाडी धरण प्रकल्प कालव्याचे काम संथगतीने – सदानंदराव भोसले
रत्नागिरी, (प्रतिनिधी):-शासनाची अनास्था व अदुदर्शी लोकप्रतिनिधी यांच्या कचाट्यात खेड तालुक्यातील शिरगाव पिंपळवाडी डुबी नदी वरील धरण प्रकल्प अडकला असुन दोन्ही बाजूला असलेल्या कालव्यांचे काम संथ गतीने सुरू असून दर वर्षी कोट्यवधीचा निधी प्राप्त होत असतो मात्र भरीव आर्थिक निधीची तरतूद व योग्य ठेकेदार लाभत नसल्याने दुतर्फा असलेल्या कालव्यांचे काम संथ गतीने सुरू असून अजुन किती कालावधी पूर्णते करिता लागेल सर्व राम भरोसे आहे असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मंडणगड दापोली हे तालुके भौगोलिक दृष्ट्या दऱ्याखोऱ्याच्या दुर्गम भु भागात गणले जातात. शासकीय योजनांच्या विकासाबाबत अद्याप पुर्णतः मागासलेले म्हणुन नोंद घ्यावी लागेल. काही प्रमाणात विकास व निधी बाबत ढोल बडवले जातात मात्र अजुन विकास दृष्टीक्षेपात दिसत नाही. खेड तालुक्यातील एकमेव धरण प्रकल्प कूर्मगतीने का होईना पूर्णत्वास नेला व खेड तालुक्यातील अनेक प्रकल्पांना शासकीय मंजुर्या मिळाल्या मात्र ५ कोटीचा पिंपळवाडी डुबी नदीवरील प्रकल्प १०० कोटीच्या घरात जावून देखील अपूर्ण आहे. धरण प्रकल्प पुर्ण झाला असला तरी धरणाच्या डाव्या उजव्या बाजूस कालव्यांची कामे अद्याप अपुरी आहेत असे बोलताना खंत व्यक्त करताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी आपण लवकरच या कामी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे सांगितले.
या वेळी बोलताना भोसले यांनी सांगितले नातुवाडी धरणाने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या तश्याच प्रकारचा एक प्रकल्प खोपी शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प म्हणुन १९८२ ला सातगाव पंचक्रोशी करिता प्रस्तावित झाले. शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे १०० कोटीचा नाहक बोजा शासनाच्या तिजोरीवर पडला असुन शिरगाव खुर्द येथील गावच्या लोकांची पुनर्वसनाची देखील गेल्या ३५ वर्षात कारवाई केली नाही असे बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले हे कालव्यांचे काम पूर्ण झाले तर आजूबाजूची लाखो एकर जमीन ओलिताखाली येऊन अर्धपोटी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे नष्टचर्य संपणार आहे परंतु थोडक्या निधी मुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे आम्ही केवळ शासनाला दोष देत नाही शासन लोकप्रतिनिधी व स्थानिक सर्व पक्षीय नेते यांच्यात सामंजस्य निर्माण होत नाही तोपर्यंत हे कोटी रुपये पाण्यात गेल्या सारखेच आहेत. शासनाने या बाबत गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकल्प पुर्ण होण्यास भरीव आर्थिक निधीची तरतूद करायला हवी असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.
सध्या खेड तालुक्यातील सात आठ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असुन निधी अभावी कामे ठप्प आहेत त्या साठी थोडाफार निधीची तरतूद करण्यात शासनास भाग पाडले तरी कामास गती येईल मात्र राजकीय पक्षोपपक्षांचे नेत्यांबाबत ग्रामीण विकास बाबत अदुदर्शीपणा जाणवतो स्थानिक समस्यांबाबत विविध विचारांच्या नेतृत्वात एकवाक्यता झाल्यास डूबी प्रकल्पच काय अनेक प्रकल्प कार्यान्वित होऊन हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल या साठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे प्रतिपादन मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.