शेतामध्ये औषध फवारणी करताना शॉक लागून एकाचा मृत्यू

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    शेतामध्ये औषध फवारणी करताना शॉक लागून एकाचा मृत्यू

     

     

     

     

    कुंभोज/वार्ताहर(विनोद शिंगे):- नागाव तालुका हातकणंगले येथील चेअरमन पाणंद परिसरातील शेतामध्ये उसावर औषध फवारणी करत असताना शेतावरून गेलेली तार अंगावर पडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.

    Advertisements

    घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सुनील बापू शिंदे (वय ४३,)कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले श्री काटे यांच्या नागाव येथील शेतामध्ये ते वाटेकरी म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ते शेतामध्ये ऊस पिकावर औषध फवारणी करत असताना अचानक पणे शेतावरून गेलेली तार अंगावर पडलेने विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच नागावचे पोलीस पाटील बाबासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यानंतर तातडीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सी.पी.आर. येथे पाठवण्यात आला.

    महावितरणचे किरण तरडे हे अधिकारी कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी घटनास्थळी केली होती. या आकस्मिक घटनेमुळे नागावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची फिर्याद शरद पाटील यांनी दिली आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements