वडगावात राजर्षी छ.शाहू महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण
पेठवडगाव,(प्रतिनिधी):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्त आणि माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत निसर्गप्रेमी मित्र,पेठ वडगाव संस्था आणि नगरपालिका पेठ वडगांव यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक महालक्ष्मी तलाव परिसरात असणाऱ्या उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानात १५० देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यापैकी मोह, वड, पिंपळ, कदंब, जारुळ, कांचन,बकुळ, सोनचाफा, कडुनिंब,मोर आवळा, बहावा ई ५० देशी वृक्षांची मोठी रोपे लावण्यात आली आहेत. कॉटन किंग च्या संचालिका शुभदा प्रदीप मराठे यांनी या वृक्षारोपणासाठी सहकार्य केले आहे. किसान शेती भांडार चे निलेश घारसे यांनी खते देवून सहकार्य केले. या उपक्रमात मुख्याधिकारी सुमित जाधव , पालिका अधिकारी, कर्मचारी, निसर्गप्रेमी मित्र चे डॉ अमोल पाटील, प्रकाश जगदाळे ,निलेश घारसे, अमोल चरणकर, नेताजी पाटील, डॉ निलेश ढोबळे, डॉ अंजना जाधव, बाजीराव माळी, राजेंद्र भोसले, विशाल पाटील, ग्रामसेवक नंदकुमार थोरात, विवेक गुरव, शिरीष पिसे, किरण पाटील, दादासो घाटगे, सत्वशील जाधव तसेच स्थानिक नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
🔲—–
ऐतिहासिक महालक्ष्मी तलाव परिसर जैवविविधतेने समृध्द आहे, या परिसरात विविध प्रकारची झाडे, दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे, सरीसृप प्राण्यांचा आधिवास आहे. यांचे संर्वधन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी सामाजिक वनीकरण,पालिका प्रशासन तसेच निसर्गप्रेमी मित्र संस्थे मार्फत स्व .उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानात देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षी वणवा लागून त्यातील मोठी झाडे जळून खाक झाली होती. त्याठिकाणी यावेळी मोठी स्थानिक रोपे लावण्यात आली आहेत. वणवा लागू नये याची खबरदारी पालिका प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
डॉ.अमोल पाटील निसर्गप्रेमी मित्र,पेठ वडगाव