आमदार राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पेठ वडगाव, (मोहन शिंदे) :- हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे MLA RajuBaba Avle यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.राजकीय सामाजिक, शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या.
सकाळी इचलकरंजी येथील निवासस्थानी हुपरी, हातकणंगले परिसरातील नेते, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.त्यांनतर वाठार येथील महात्मा फुले सहकारी सूतगिरणी कार्यस्थळावर शुभेच्छा स्विकारण्यासाठी आमदार उपस्थित राहिले.
यावेळी हातकणंगले तालुक्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.
त्यामुळे दिवसभर सूतगिरणी परिसर गर्दीने फुलून गेला होता.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,खासदार सुप्रिया सुळे,धनंजय महाडिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील,राजेश पाटील,माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,प्रकाश आबिटकर,माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
सूतगिरणी येथे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी शुभेच्छा देत काँग्रेसची ताकद भक्कम करा अशा संदेश दिला. माजी नगराध्यक्ष संजय आवळे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राजाराम कारखाना माजी चेअरमन सर्जेराव माने शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष आप्पासो एडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर बालदार,माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी,वारणा कारखाना संचालक सुभाष जाधव,डाॅ.अशोक चौगुले,अजय थोरात, बाजीराव सातपुते, शशिकांत खवरे, राजवर्धन पाटील,बबन पाटील, शंकर शिंदे,अमर पाटील सलिम जमादार, सुरेश नाईक,सुशेनराव शिंदे,सचिन पाटील, सचिन चव्हाण, धोंडिराम पाटील,मुकुंद पाटील, चेतन चव्हाण,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कपिल पाटील, दयानंद मालेकर, उत्तम सावंत, अच्युत खोत,अर्जुन पाटील,दौलत मोहिते किरण मोहिते,रणजित निकम, सर्जेराव डाळे, सुनिल देशमुख, अभिजीत इंगवले,उमेश गुरव,कृष्णात मसुरकर, सुकमार चव्हाण, सुजितसिंह मोहिते, अविनाश घोडेस्वार, तानाजी घोडेस्वार, डाॅ.विजय गोरड,पंडीत लोकरे,रमेश पाटील, रायसिंग भोसले,दिपक पाटील,युवराज मिरजे, रणजित पाटील,सपोनि पंकज गिरी,राहुल माने, सुरज जमादार, रमेश पाटोळे,सौरभ गावडे, रोहित माने, शिवाजी पाटील,किरण भोसले, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, आक्काताई पाटील, इंदुमती गाडवे,नंदाताई दाभाडे आदी उपस्थित होते.
🔲—-
आमदार राजुबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव अंबप रोडवर त्रिमूर्ती प्रोजेक्ट इंजिनिअर यांचेवतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मनिष पांडे,राजवर्धन पाटील, प्रताप काटकर,अमित जाधव उपस्थित होते.