शिंदेवाडी येथे बाळुमामा ट्रस्ट आदमापूर यांच्या पालखी व बगा नं 18 चे उत्साहात स्वागत

    शिंदेवाडी येथे बाळुमामा ट्रस्ट आदमापूर यांच्या पालखी व बगा नं 18 चे उत्साहात स्वागत

    पन्हाळा,(प्रतिनिधी):-शिंदेवाडी(ता.पन्हाळा) येथे सदगुर संत श्री बाळुमामा यांच्या पालखी व बग्गा न.18 बकऱ्यांचे आगमन झाले, बक-यांच्या पालखीच्या आगमनाने गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, ढोल-कैताळाच्या व डी. जे च्या वाद्यामध्ये पालखीची गावामध्ये मिरवणुक काढण्यात आली, यावेळी गावामध्ये रांगोळी व फुलांच्या सड्‌यांनी गावातील रस्ते सुशोभीत केले होते. तसेच जागो जागी हल्दीकुंकु व पालखीला औक्षण कार्यक्रम झाला. सायंकाळी 7 हजार लोकांचा महाप्रसाद वाटप झाले व नंतर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम पार पडला यावेळी भागातील हजारो लोकांनी पालखीचे दर्शन घेतले,

    चारापाणी मिळेल तशी मामांची बकरी भक्त मंडळींना भेट देत गावोगावी फिरत असतात, संत बाळुमामांच्या एकुण 18 बग्यापैकी बगा नं. 18 मध्ये अंदाजे 6000 बकरी व शेळ्या आहेत राखणेसाठी 400 लोक आहेत.

    सदर या कार्यक्रमाला शिंदेवाडी गावातील सर्व तरुण मंडळे, ग्रामपंचायतव सर्व ग्रामस्थ व समस्त धनगर समाज यांचे सहकार्य लाभले.