“भक्ती” सिनेमामध्ये अन्वी पवार दिसणार मुख्य भूमिकेत
पुणे : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा गावातील पवारवाडी चे महेश पवार हे सध्या नोकरीमुळे आणि मुलांच्या शिक्षणामुळे शिरूर येथे राहत आहेत. ज्ञानगंगा विश्वविद्यालययात त्यांची कन्या तिसरीत शिकत आहे. तिने शिरूर मध्ये 14 वर्षापासून सुरु असलेल्या ” नटराज कोहिनुर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिटयूट” Natraj Kohinoor dreamsAcademy of Film Institute या इन्स्टिटयूट मध्ये ॲक्टिंग आणि डान्स या विषयाचा कोर्स जॉईन केला आहे. कोर्स सुरू असताना तिच्या अभिनयातील गुण पाहता आणि याच इन्स्टिटयूट च्या अश्वयुग फिल्म प्रॉडक्शनचा AshuYug Film production सध्या भक्ती नावाच्या वेबसिनेमाचे चित्रीकरण सुरु होत असल्याने. त्या वेब सिनेमांमध्ये अन्वीची मुख्य भूमिकासाठी निवड झाली आहे. सध्या आणि अन्वीचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे. वेबसिनेमाचे दिग्दर्शन भाऊसाहेब इरोळे यांचे असून भाऊसाहेबांचा ‘ निळावंती एक रहस्य ” हा मराठी चित्रपट ऑक्टोबर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या आधीही इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे संचालक दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांनी अनेक अल्बम सॉंग , चित्रपट , वेबसिरीज , सिरीयल , शॉर्ट फिल्म इ मुख्य भूमीकेसह काम करण्याच्या संधी दिल्या आहेत.
भक्ती या वेबसिनेमात 1 गाणे असून त्या गाण्याचे रेकॉर्डिंग आज पूर्ण झाले आहे. पारनेर , शिरूर सह पांडुरंगाच्या वारीमध्ये याचे चित्रीकरण लवकरच पूर्ण होऊन हा सिनेमा आपल्याला जुलै अखेर पाहायला मिळेल.