डी.वाय.पाटील बी टेक ॲग्रीच्या स्वप्निलचे गेट परीक्षेत यश
नवे पारगाव,(प्रतिनिधी):- देशातील विविध आयआयटी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ग्रॅज्युएट ॲपटीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात ‘गेट’ परीक्षेमध्ये तळसंदे येथील डॉ.डी.वाय पाटील बी टेक ॲग्रीच्या BTech agree स्वप्निल कामटे याने यश मिळवले आहे. आय. आय.टी.गुवाहाटी IT Guwahati येथे त्याला प्रवेश मिळाला आहे.
यावर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर मार्फत गेट 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यश मिळवून स्वप्निल कामटे याने आय. आय. टी. गुवाहाटी मध्ये ॲग्री अँड रुरल टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटला ऍडमिशन मिळवले आहे. आयआयटी मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यानंतर त्याला केंद्र सरकारकडून प्रति महिना 12 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मध्ये प्रवेश मिळावा हे अभियांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेकांचे स्वप्न असते. यासाठी भारतातील विविध अभियांत्रिकी विद्याशाखेचे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेची तयारी करत असतात.
कठोर मेहनत घेतल्यास यशाच गवसणी घालता येते हे स्वप्निलने दाखवून दिले आहे. त्याने आयआयटी गुवाहाटी मध्ये ॲग्री अँड रुलर टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट मध्ये इंटरव्यू देऊन अव्वल स्थान मिळवले आहे. पुढील वर्षीही अधिक विद्यार्थी सहभागी होऊन यश मिळवतील यासाठी डॉ. डी वाय पाटील बी टेक कॉलेज सर्वतोपरी प्रयत्न करेल असे कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. सुहास पाटील यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी स्वप्निलचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.