डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाची पूजा रसाळ महाराष्ट्रात दुसरी

    डॉ.डी.वाय पाटील कृषी महाविद्यालयाची पूजा रसाळ महाराष्ट्रात दुसरी

     

    तळसंदे :- तळसंदे ता. हातकणंगले येथील डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील विद्यार्थिनी पूजा रसाळ हिने महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला. तर प्रगती तोरस्कर हीने राज्यात चौथा क्रमांक मिळवला

    दरवर्षी कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसदेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये पूजा रसाळ हीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून प्रगती तोरस्कर हीने चौथा क्रमांक मिळवला. ऋषिकेश पानारी व अश्विनी सानप यांनी 15 वा, प्रमोद दांगडे 19 वा, रोशन देवगुडे, श्रद्धा जाधव आणि नानासो वगरे यांनी 21 वा श्रद्धा सनस 23 वा, विश्वजीत कुबडे 25 वा, अमृता पवार 26 वा, प्रथमेश अडसूळ 27 वा, प्राजक्ता फडतरे व अजिंक्य पाटील 28 वा, राजनंदनी इंगवले 30 वा, माधुरी भोर व खुशीया मुलानी 32वा, , श्वेता गोसावी 35 वा, ऋतुजा जानकर 36वा, शर्वरी जमदाडे 38 , गौरव पाटील 40 वा, ऋषिकेश दिसले व कोमल कदम 44 वा, प्रतीक कुंभार 45 वा, दिशा पाटील 48 आणि प्रणव होनमोरे व अवंतिका पाटील 50 वा क्रमांक प्राप्त केला.

    महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल प्राचार्य डी. एन. शेलार यांनी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयात सुरुवातीपासूनच पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थी देशातील विविध महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. या सर्वांनी मिळवलेल हे यश सर्वच विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.