डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात सोमवारपासून आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद
नवेपारगाव : डी.वाय.पाटील DY Patil कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय संशोधन विकास आणि नवोपक्रम (आर.डी.आय.पी.)RDIP परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्धिक संपदा अधिकार, अनुदान आणि पब्लिकेशन्स या विषयावरील ही परिषद सोमवार दिनांक 24 जून ते शुक्रवार दिनांक 28 जून या कालावधीत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले रिसोर्स पर्सन ISTE, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह के. देसाई, वेग्रो इंडिया रिसर्च अँड इनोव्हेशनचे मुख्य शास्त्रज्ञ आणि सीईओ रमेश चंद्र पांडा, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. (डॉ.) चंद्रकांत लोखंडे, होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रजनीश कामत , क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठ, ऑस्ट्रेलियाचे प्रा. डॉ दीपक डूबल, मंगलायतन विद्यापीठ मध्यप्रदेशचे डॉ. गोंटिया मिश्रा, सिम्बायोसिसचे डॉ. अरुणा पवते,एसकेएन सीओई, पुणेचे डॉ. प्रभात रंजन, सिंहगड संस्थेचे डॉ. संकेत चरखा आदी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
या परिषदेत पेटंट करणे, नवकल्पनांचे संरक्षण, कॉपीराइटची गरज, सर्जनशील कार्यांचे रक्षण, प्रस्ताव सादरीकरण,अनुदानसाठी योग्य पद्धतीने अर्ज तयार करणे, त्यासाठीची धोरणे, प्रकाशन संशोधन प्रसार आदी विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी दिली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.योगेश चिमटे, डॉ.श्रद्धा श्रीवास्तव व टीम प्रयत्नशील आहे.