Home कोल्हापूर जिल्हा झेडपी शाळेत दिला जाणाऱ्या शासनाच्या योजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष केवळ दिखाऊपणा, ठेकेदार...

झेडपी शाळेत दिला जाणाऱ्या शासनाच्या योजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष केवळ दिखाऊपणा, ठेकेदार मालामाल

झेडपी शाळेत दिला जाणाऱ्या शासनाच्या योजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष केवळ दिखाऊपणा, ठेकेदार मालामाल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कुंभोज ,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज सह हातकणंगले तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासनाच्या वतीने पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप आर्थिक महिला विकास महामंडळ यांचे वतीने शाळांना वाटप करण्यात आले आहे. परंतु सदर गणवेश त्या विद्यार्थ्यांना बसतात का याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गणवेश मोठे झाले असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ते बसेनात अशी अवस्था झाली आहेत. जिल्हा परिषद शाळेत दिला जाणाऱ्या शासनाच्या योजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष केवळ दिकाऊपणा? ठेकेदार मालामाल, कोणाला तर खुश करण्यासाठी कोणाचा तर बळी? शालेय शिक्षण विभागाचे चाललय तरी काय ग्रामीण भागात शालेय गणवेशाला पालकांचा विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

 

 

परिणामी शासनाने विद्यार्थ्यांची कोणतेही मोजमाप न करता केवळ तुकड्यांच्या वर आधारित असणारे गणवेश वाटप केले असल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी कुंभोज परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे गणवेश जिल्हा परिषदेच्या शाळेतून वाटण्यात आली असून,ए सदर गणवेश विद्यार्थ्यांना तात्काळ बदलून मिळावेत अशी मागणी पालक वर्गातून होत असून याबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या कडून माहिती विचारली असता सदर गणवेश जिल्हा परिषदेकडून महिला मंडळांच्या मार्फत शाळेला आले असल्याची माहिती मिळाली असून, लवकरच गणवेश बदलून दिले जातील असेही सांगितले.

 

 

 

 

तसेच आता विद्यार्थ्यांना सुरुवातीला दोन पैकी एकच गणवेश वाटप केलाअसून उर्वरित गणवेश कधी मिळणार याकडे पालकांचे लक्ष वेधले आहे. चार महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीत गणवेशाचे काम जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्यांना दिले त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होते का? असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून निर्माण होत असून सदर चुकीचे गणवेश तात्काळ बदलून मिळावेत अशी मागणी पालक वर्गातून सध्या जोर धरत आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांना शासन पुरवत असलेल्या योजना खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात का त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते का शालेय पोषण आहार वेळेत व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मिळतो का याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे असून, शालेय पोषण आहारात शाळांना पुरवले जाणारे चटणी मीठ तेल व अन्य धान्याचे पाकीट केवळ वरुन दिखाऊ पणा असून आतील धान्य कितपत योग्य असते याची चौकशी करणे गरजेचे आहे. परिणामी अंगणवाडी विभागात लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार केवळ दिखावा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी हळद चटणी व अन्य कडधान्य किती निकृष्ट दर्जाची असतात याची चौकशी होणे गरजेचे आहे.