Home आरोग्य एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली मध्ये  जागतिक योग दिवस संपन्न

एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली मध्ये  जागतिक योग दिवस संपन्न

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली मध्ये  जागतिक योग दिवस संपन्न

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली Bahubali मध्ये 21 जून जागतिक योग National yoga day दिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाले.

Advertisements

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या औचित्याने योग प्रशिक्षक बाळासो चौगुले व वंदना जमदाडे यांनी ‘उत्तम आरोग्यासाठी योगासने’ याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थी, अध्यापक, अध्यापिका यांच्याकडून अर्हम योग ध्यान, ओंकार, योग प्रार्थना,व शांततेसाठी पंचमुद्रा योगासनांचे प्रात्यक्षिके करून घेतले.

21 जून सर्वात मोठा दिवस व दक्षिणायन या भौगोलिक घटनेची माहिती अध्यापक प्रमोद पाटील यांनी दिली.

योगगुरु कांचनताई कापसे यांच्या स्मरणार्थ ‘योग निबंध स्पर्धा’ घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण योग प्रशिक्षक बाळासो चौगुले व वंदना जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून योग साधक बाळासो चौगुले व वंदना जमदाडे हे उपस्थित होते, यावेळी त्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यवसाय विभागप्रमुख अरुण चौगुले यांनी मानले तर सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख शरद जुगळे यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements