शिरोली अतिक्रमणधारकांचा प्रश्न निकाली

    शिरोली अतिक्रमणधारकांचा प्रश्न निकाली

     

     

    कुंभोज/प्रतिनिधी ( विनोद शिंगे):- येथील रहिवासी अतिक्रमण नियमित करण्याच्यादृष्टीने अतिक्रमण धारकांच्या घराचे पंचनामे करण्याचे काम बुधवारी सुरू झाले.मंडल अधिकारी सीमा मोरये, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम, तलाठी नितिन जाधव, तलाठी अभिषेक पतंगे, तलाठी नागेश तोंदरोड यांच्या पथकाने महाडिक कॉलनीतील अतिक्रमणाचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले.

    शिरोलीतील गोसावीवाडी, रेणुकानगर, महाडिक कॉलनी, बहुरूपी वसाहत येथील रहिवाशी अतिक्रमण कायम करावीत. अशी मागणी सरपंच सौ.पद्मजा करपे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे-चौगुले व तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार अतिक्रमणधारकांचे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मंडल अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळपासून महाडिक कॉलनी येथील अतिक्रमणधारकांच्या पंचनामेचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये अतिक्रमणधारकांचे क्षेत्र, त्यांच्याकडील रहिवासी पुरावे, शासकीय कागदपत्र यांची माहिती घेण्याचे काम मंडल अधिकारी सीमा मोरय यांच्या पथकाने सुरू केले आहे.

    यावेळी सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, राजेश पाटील, प्रकाश कौंदाडे, शिरोली विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील, उदय पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, शक्ती यादव, वसिफा पटेल, कमल कौंदाडे, मनीषा संकपाळ, माजी सरपंच अनिल शिरोळे, सलीम महात,बाळासो पाटील, योगेश खवरे, शिवाजी समुद्रे, शिवाजी पाटील, कोतवाल संदीप पुजारी, दादाभाई देसाई आदी उपस्थित होते.