पर्यावरण रक्षणामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची- डॉ. अंजली पाटील
डी.वाय.पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन साजरा
नवे पारगाव : पर्यावरण रक्षणामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण असून याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा. पर्यावरण संवर्धनाबाबत नवनवीन कल्पना शेअर करून पर्यावरण संरक्षणामध्ये योगदान द्यावे असे आवाहन राजाराम महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली पाटील यांनी केले.
डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे जागतिक पर्यावरण दिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कुलगुरु प्रा. (डॉ.) के. प्रथपन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कन्झर्व्हेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अंजली पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यानी किमान एका कौशल्याचा सतत अभ्यास करून संशोधन करावे, पर्यावरण संवर्धनाबाबत नवनवीन कल्पना शेअर कराव्यात. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड, उत्पादनांचा पुनर्वापर यावर भर द्यावा.
डॉ के. प्रथापन यांनी जमिनीची काळजी, जमिनीचा पुनर्संचय, वाळवंटीकरण थांबवणे, दुष्काळी प्रतिकारशक्ती निर्माण करणे आणि माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष थांबवणे याबद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 200 कागदी पिशव्या तयार केल्या. या पिशव्या डॉ. अंजली पाटील आणि श्री. आशिष घेवडे यांच्याकदे सुपूर्द करण्यात आल्या. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान, 6 जून रोजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आले. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अक्षता चव्हाण यांनी या दिवशी शिवगर्जना सादर केली.
यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत, प्रा.डॉ. मुरली भूपती, डॉ. संग्राम पाटील, डॉ. जयंत घाटगे, डॉ. गुरुनाथ मोटे, डॉ. शुभांगी जगताप, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. जयदीप पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जान्हवी पाटील यांनी केले. डॉ. सदाशिव कल्याण, श्रीमती रेश्मा बेग आणि कु. स्मितल कांबळे यांनी नियोजन केले.
कुलपती डॉ.संजय डी.पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
तळसंदे: पर्यावरण दिनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी पिशव्यांचे अनावरण करताना डॉ. के. प्रथापन, डॉ. अंजली पाटील, आशिष घेवडे, डॉ. मुरली भूपती.