इचलकरंजी शहरातील विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    इचलकरंजी शहरातील विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन

     

     

     

    इचलकरंजी,(प्रतिनिधी):- इचलकरंजी शहरातील विविध समस्यांबाबत आज इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने सहा.उपायुक्त केतन गुजर व उपायुक्त सोमनाथ आढाव यांची भेट घेत निवेदन दिले.

    Advertisements

    डेक्कन चौकातील वाहतुकीस शिस्त लावणे,फेरीवाल्याना शिस्तीत बसवणे पट्टे मारून देणे,सावली सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर त्वरित पॅचवर्क करणे,अतिक्रमण मोहिमेची अवस्था लांडगा आला रे आला अशी होत असून मोहीम प्रभावीपणे राबवणे,तांबेमाळ येथील टाकी ओवरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले असून सदर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यास बडतर्फ करणे, भटक्या कुत्र्यानी थैमान घातले असून तात्काळ त्याबाबत उपाययोजना करणे,भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात सातत्य ठेवणे गरजेचे असताना प्रशासनाकडून ते होत नसल्याने केलेल्या निर्बिजीकरणाचा काही उपयोग होत नसून उपद्रव वाढत आहे.प्लॅस्टिक बाटल्या व पिशव्यांचे प्रमाण गटारीत टाकल्याने एका पावसात महापालिकेची यंत्रणा उघडी पडली. फेरीवाल्याकडून प्लॅस्टिक वापराचे प्रमाण वाढत असून दंड मात्र दुकानदार व्यापाऱ्यांना केला जातो,फेरीवाल्यावर कारवाई होत नाही याचा ते गैरफायदा घेत असून ताबडतोब प्लॅस्टिक वापर कमी करण्यासाठी पथक नेमावे अशी मागणी करण्यात आली.गटारी व फुटपाथ बांधताना पाणी जमीणीत झिरपण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे एखाद्या पावसात रस्त्यावर पाणी येते.त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार साठी व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.

    यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी त्वरित प्लॅस्टिक बाबत स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांना अधिकार देऊन कारवाई तीव्र करण्यात येईल,प्लास्टिक बाटल्याबात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर संकलन करण्याबाबत प्रयत्न केले जातील,पाणीप्रश्नी हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांस कारणे दाखवा नोटीस काढली असून त्यावर खुलासा आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

    सहा उपयुक्त केतन गुजर यांनी अतिक्रमण मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याकरिता उपाययोजना करत असून,सावली सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवरील पॅचवर्क त्वरित करण्यात येईल,त्याच बरोबर भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबाबत सातत्य ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.

    यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर,अमित बियाणी,राजु आरगे,सुहास पाटील,शितल मगदुम,राम आडकी,महेंद्र जाधव,संजय डाके,अभिजित पटवा उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements