Home कोल्हापूर जिल्हा नवे चावरेत कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याने महिला त्रस्त

नवे चावरेत कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याने महिला त्रस्त

नवे चावरेत कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याने महिला त्रस्त

 

 

 

नवे पारगाव : नवे चावरे (ता. हातकणंगले) येथील शिवाजी चौक परिसरात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने मेटाकुटीला आलेल्या महिलांनी आमदार डॉ.विनय कोरे MLA Dr.Vinay Kore यांची वारणानगर येथे भेट घेतली. हा प्रश्न तातडीने मार्गी लावू अशी ग्वाही डॉ. कोरेनी दिल्याने महिलांतून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

नवे चावरे येथील मुख्य रस्त्याच्या पूर्वेस विद्युत पुरवठा कमी दाबाने होतो. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे चालत नाहीत. तसेच सध्या तीव्र उन्हाळा असल्याने रात्री फॅनसारखे उपकरण चालत नसल्याने लोकांना नाहक त्रास जाणवत आहे. चावरे हे गाव कोडोली कार्यालयातंर्गत नवे पारगांव उपकेंद्र आहे. या दोन्ही कार्यालयातील

अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करुनही उपयोग झाला नाही. अखेर आज महिलां एकत्र झाल्या आणि थेट कोडोली येथील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या कार्यालयात जाऊन महिलांनी कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठा बाबत व्यथा मांडल्या. डॉ. कोरेनी कोल्हापूर व कोडोली येथील संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. आठवडाभरात प्रश्न मार्गी लागेल अशी ग्वाही डॉ. कोरे यांनी महिलांना दिले. दरम्यान कोल्हापूर कार्यालयात दीपक पाटील यांच्याशी डॉ. कोरे यांनी संपर्क साधला असता शनिवारी त्या भागाचा सर्व्हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शारदा पोवार, राजश्री निकम, सावित्री जाधव, शोभा साठे, सुनीता निकम, वैशाली निकम, शोभा सुतार, रुपाली कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.