बिरोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात हिवरखान देवाची पालखी वारणा नदीच्या भेटीला 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    बिरोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात हिवरखान देवाची पालखी वारणा नदीच्या भेटीला

     

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरदेव हिवरखान देवाची जळाची परडी वारणा नदीच्या भेटीला रवाना झाली, हजारो भक्तांच्या उपस्थितीत बिरोबाच्या नावाने चांगभल्याचा गजर करत व भंडाऱ्याची उधळण करत सदर परडी यात्रा तब्बल तीन किलोमीटर पायी प्रवास करत, कुंभोज बिरदेव मंदिर ते वारणा नदीकडे अनेक मानकरी सालकरी गावकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रवाना झाली. तालुक्यातून आलेले धनगर समाजाचे ढोल वादक गावातील वेगवेगळ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर धनगर समाजाचे कार्यकर्ते तरुण मंडळी यांच्या उपस्थितीत परडी व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    Advertisements

     

    गेल्या अनेक वर्षानंतर कुंभोज येते बिरदेव हिवरखान देवाची जळाची परडी यात्रा संपन्न झाली. सदर यात्रेसाठी कुंभोज परिसरातील सर्व धनगर समाजाने सहभाग घेतला, हजारो भक्तांच्या उपस्थितीत सदर जळाची परडी यात्रेला सुरुवात झाली. गावचे प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील ,माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर माजी खासदार जयवंतराव आवळे, दलित मित्र अशोकरावजी माने आदित्य पाटील ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर परडी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवत झाली. यावेळी धनगर समाजाच्या वतीने येणाऱ्या हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराची करण्यात आलेली सजावट दारात काढण्यात आलेली रांगोळी परिसरात असलेले भंडाऱ्याची उधळण अनेक गावातून आलेले वालुंग व गावातील धनगर समाजातील पै पाहुणे यामुळे कुंभोज सह परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

     

    यावेळी धनगर समाजाच्या मानाच्या असणाऱ्या गावडे परिवाराच्यावतीने हेडाम खेळण्यात आले. यावेळी देवाची भाकणूक ही सांगण्यात आली. दुपारी बारानंतर मोठ्या दिमाखात बिरदेव हिवरखान देवाची पालखी नदीपासून गाव भेटीसाठी रवाना झाली सायंकाळी सात वाजता सदर पालखीचे गावात आगमन झाले. अनेक ठिकाणी देवमाळी परिसरात पालकीचे अनेक महिलांनी आवर्षण करून स्वागत केले. रात्रभर चालणाऱ्या पालखी महोत्सवात पावसाचे आगमन झाल्याने बिरोबाचा भंडारा धुण्यासाठी वरून राज्याचे आगमन झाले असावे अशी आख्यायिका परिसरात बोलली जात होती परिणामी तब्बल दोन महिन्यानंतर कुंभोज परिसरात देवाची पालखी बाहेर पडली व पावसाचे आगमन झाल्याने सर्व समाजाच्या नागरिकांनी बिरोबाचे आभार मानले. आज सकाळी 11 वाजता बिरोबाच्या पालखीचे मंदिरात आगमन झाले. यावेळी सालकरी मानकरी यांच्यावतीने प्रमुख विधी संपन्न होऊन हजारो भक्तांच्या महाप्रसादाला सुरुवात झाली. उद्या दुपारी सदर जळाची परडी यात्रेचा सांगता समारंभ होणार असून या सांगता समारंभासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements