उज्वल ध्येय युथ फाउंडेशन च्या वतीने अनोखा उपक्रम 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    • उज्वल ध्येय युथ फाउंडेशन च्या वतीने अनोखा उपक्रम

     

     

    वडगाव ,प्रतिनीधी:- आज सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर दर वर्षी आजच्या दिवशी काही तरूणांना वेगवेगळ्या दारू पार्टीचे आयोजन करण्याच्या जय्यत तयारीत मग्न असतात. मात्र वाठार (ता. हातकणंगले) येथील उज्वल ध्येय युथ फाउंडेशन Ujjwal dhyēya Youth Foundation च्या वतीने 31 डिसेंबर चे औचित्य साधून वाठार शहरातील मुख्य स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबवुन सामाजिक बांधिलकी जपली.

    यावेळी स्काय ग्लोबल ग्रुपचे सर्वेसर्वा उज्वल ध्येय युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, युवा उद्योजक माननीय शरद बेनाडे यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी पाश्चात्त्य संस्कृती अनुकरण करून व्यसनाधीन होण्यापेक्षा समाज उपयोगी उपक्रम राबवून समाज हिताचे काम करावे असे आव्हान केले.

    Advertisements

     

    या उपक्रमास वाठार ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश कुंभार (एमके), ग्रा.प.सदस्य गजेंद्र माळी, सचिन कुंभार, संजय मगदूम, युवा उद्योजक अमोल क्षीरसागर, ज्येष्ठ मार्गदर्शक बीएस. पाटील, युवा नेते सुरेश नरके, सयाजी पाटील, अमोल चौगुले,सुधाकर वाटेगावे तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज चौगुले, उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर,महेश कोले, गजानन पाटील, सोमनाथ सुतार, तुषार नंदवडकर,ओमकार मगदूम,गणेश पाटील, प्रमोद मगदूम, गजानन खबाले, क्राती भोसले, प्रवीण मगदूम, ओमकार पाटील, प्रवीण कुभांर, संतिश चौगुले, प्रणव काळे, महादेव पेटकर, स्वपनिल पाटील, मयुर कापसे, सूरेश कुभांर, शरद चौगुले आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements