सह्याद्री व्याघ्र राखीव वनपरिक्षेत्र आंबा या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंद
सातवे,(प्रतिनिधी):- वनपरिक्षेत्र Forest area सह्याद्री व्याघ्र राखीव, आंबाचे कार्यक्षेत्रामधील आंबा सडा हे निसर्ग पर्यटन स्थळ Nature tourism destination 30,31 डिसेंबर व 1 जानेवारी या दिवशी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. आंबा,सडा परिसरामध्ये रानगवे, सांबर, अन्य तृणभक्षी प्राणी तसेच वन्यप्राणी बिबट, अस्वल, रानकुत्रे इत्यादी मांसभक्षी प्राण्यांचे अधिवास असल्याने 31 डिसेंबर वर्षा अखेर व नवं वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सह्याद्री व्याघ्र राखीव प्रशासनाने 30,31 डिसेंबर व 1 जानेवारी या दिवशी सर्व प्रकारचे पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत वन्यजीव विभागाची ठिकठिकाणी फिरती पथके तैनात करण्यात आलेली आहे. 30,31 डिसेंबर व 1 जानेवारी या दिवशी विनापरवाना व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये अपप्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजविणे, प्लास्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 अन्वये कारवाई करण्यात येईल. असे वन परिक्षेत्र सह्याद्री व्याघ्र राखीव, आंबा यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे .