दारु नको, दूध प्या” – डॉ.राहूल मोरे यांचा संकल्प
नवे पारगाव, ता.31: इस्लामपूर येथील मानसोपचार तज्ञ डॉ. राहूल मोरे यांच्यावतीने “दारु नको, दूध प्या” या संकल्पने अंतर्गत मसाले दूधाचे वाटप प्रसंगी वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, सरपंच सुजाता जाधव यांच्या हस्ते झाले.
माजी सैनिक सुकुमार पाटील यांनी स्वागत केले. विद्याराणी पाटील यांनी व्यसनाधीनतेचे तोटे सांगून आज 31 डिसेंबर पासून दारु ऐवजी दूध घ्या असेही आवाहन केले. यावेळी सुभाष जाधव, सुजाता जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी निवृत्त पोलीस विलास कुंभार, विकास कुरणे, नामदेव चव्हाण, गोरख पाटील, तानाजी पाटील, सुनिल पाटील, बबन कुंभार, बाबासाहेब कुंभार, वैशाली कुरणे, मीना कुमार, हिमत नदाफ, शिवाजी चव्हान, बबन कुभांर, बाबासाहेब कुंभार, प्रमोद जाधव यांच्यासह युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.