Home कोल्हापूर जिल्हा विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेज तळसंदे ,येथे “वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण...

विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेज तळसंदे ,येथे “वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेज तळसंदे ,येथे “वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

 

नवे पारगाव ,(प्रतिनिधी):- तळसंदे ता.हातकणंगले येथील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेज चा “वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके (साहेब )तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले तालुका तहसीलदार  सुशील बेल्हेकर तसेच विक्रम पाटील API कुरळप पोलीस स्टेशन, विश्वास चव्हाण पाटील CEO सीमा बायोटेक तळसंदे, सुभेदार- सुशील कुमार जाधव घुणकी तसेच श्रीमती कल्पना चिकुर्डे कर मॅडम, संपतराव महाडिक . तसेच संस्थेचे सचिव डीपी पाटील .मुख्याध्यापक व व्यवस्थापक मा.श्री दीपक महाडिक सर संचालिका सौ व्ही. डी. पाटील मॅडम, संचालिका सौ डॉ. दीपिका महाडिक मॅडम, जिमखाना प्रमुख श्री संभाजी पाटील सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राम करे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव  डी.पी.पाटील सर यांनी केले.      यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी हातकणंगले तालुका तहसीलदार माननीय श्री सुशील बेल्हेकर साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असणाराच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करणे व यशस्वी तिकडे वाटचाल करावी . असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माननीय विक्रम पाटील (API) यांनी आपल्या मनोगतामध्ये तरुण पिढी बाल गुन्हेगारीकडे वळण्याचे कारण व त्याच्या उपाय याबाबत पालकांशी सविस्तर संवाद साधला. अध्यक्ष भाषणामध्ये कॅप्टन गणपतराव घोडके यांनी संस्थेच्या व प्रशालेच्या विकासाबाबत व पाल्याच्या भविष्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक तरुण भारतचे पत्रकार श्री शिवाजी पाटील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार श्री शिवकुमार सोने यांनी उपस्थिती दर्शविली त्यांनतर विविधगुणदर्शन कार्यक्रमास सुरूवात झाली. यामध्ये विध्यार्थांनी नाटिका, नृत्य व गिते सादर केली पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जाधव सर राम करे सर,शंकर काळे सर, रोहित पाटील सर, गुरूदास घोलप सर यांनी केले. आभार श्री. सागर सुतार सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी यांच्या संपन्न झाला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.