Home कोल्हापूर जिल्हा एव्हीएम इंटरनॅशनल स्कुल & ज्युनि.कॉलेजमध्ये जिल्ह्यातील एकमेव डिजीटल प्रणाली क्लासरुम्सचे उद्घाटन 

एव्हीएम इंटरनॅशनल स्कुल & ज्युनि.कॉलेजमध्ये जिल्ह्यातील एकमेव डिजीटल प्रणाली क्लासरुम्सचे उद्घाटन 

एव्हीएम इंटरनॅशनल स्कुल & ज्युनि.कॉलेजमध्ये जिल्ह्यातील एकमेव डिजीटल प्रणाली क्लासरुम्सचे उद्घाटन

 

 

नवे पारगांव : शिक्षकांसाठी स्मार्ट बोर्ड आणि डिजीटल अभ्यासक्रम मुलांमधील कलात्मक गुणांना चालना देण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी डिजीटल स्मार्ट स्कुल प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी दफ्तरमुक्त शाळा म्हणून उपयुक्त ठरेल,असे मत व्हिटेस्को टेक्नॉलॉजी’ पुणेचे कंट्री हेड व मुख्य व्यवस्थापक अनुराग गर्ग यानी बोलताना व्यक्त केले.तळसंदे,(ता.हातकणंगले) येथील श्री महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत ए.व्ही.एम.इंटरनॅशनल स्कुल & ज्युनि.कॉलेज मध्ये संपन्न डिजीटल सेन्स बोर्डचे उद्घाटन प्रसंगी गर्ग बोलत होते. अध्यक्षस्थानी विक्रमसिंह मोहिते होते तर सचीव छन्नुसिंह मोहिते हे उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक सचीव छन्नुसिंह मोहिते यांनी केले.प्रास्ताविकातून शाळेच्या नर्सरी ते १२ वी पर्यंत डिजीटल प्रणाली (इंटरॅक्टिव बोर्ड असणारी) जिल्ह्यातील पहिली व एकमेव ठरलेली शाळा असुन या विद्यालयामधील नवनवीन उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

निगडी पुणेचे रोटरी क्लब ऑफ सर्विस डायरेक्टर आश्विन कुलकर्णी, कम्युनिकेशन हेड मानसी भगत,सीएसआर कमिटीच्या आरती देवकर,व्हिटेस्कोचे प्रेसिडेंट विकास धमाले,रफीक सय्यद यांचे सह माध्यमिकच्या मुख्याध्यापिका आर एस पाटील,प्राथमिक विभागीय मुख्याध्यापिका एम पी जाधव,माता पालक श्रीमती शितल बोबडे यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-पालक आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन श्रुतिका पाच्छापुरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका आर. एस.पाटील यांनी मानले.