Home कोल्हापूर जिल्हा कोडोलीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध

कोडोलीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध

कोडोलीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे) :-कोडोली येथे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या या भ्रष्ट शासनाच्या निषेधार्थ शिवसेना पन्हाळा शाहूवाडी विधानसभेच्या वतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.नामदेव गिरी ,शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख मा.बाबा पाटील,शाहुवाडी तालुका प्रमुख दत्तात्रय पोवार,उपतालुकाप्रमुख रवींद्र निंबाळकर, विभाग प्रमुख संजय निकम ,युवा सेना तालुकाप्रमुख मा.नितीन माने, शहरप्रमुख प्रशांत कुंभार, उपशहर प्रमुख संदीप कापरे,सचिन मूडशिंगकर,जयसिंग डाकवे,अरविंद चौगुले,कृष्णात पाटील,रणजित वाडकर,शिवाजी पाटील ,अमोल पाटील भैया, महादेव पायमल, जयदीप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.तरी शिवसेना, युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.