भविष्यात कृषी संशोधनामध्ये मोठ्या संधी – प्रा.डी.एन.शेलार
डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
तळसंदे : मानवी जीवनामध्ये कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असून या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. भविष्यात कृषी संशोधन क्षेत्रात अमाप संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यानी सुरुवातीपासूनच त्या संबंधीच्या परीक्षांची तयारी करून कृषी शास्त्रज्ञ होण्याची जिद्द मनात ठेवावी. आपल्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील रहावे असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावर्षी सुद्धा डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेला उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी पसंती दिली यावेळी प्रा. डी. एन. शेलार यांनी महाविद्यालयाच्या मागील पाच वर्षात माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडला. या वेळी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमार्फत कृषि उपसंचालक, तालुका कृषि अधिकारी व मंडल कृषि अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी हेड फार्म ऑपरेशन्स इंजी. ए. बी. गाताडे, अकॅडमिक इन्चार्ज आर. आर. पाटील, डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. के. एस. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अकॅडमिक इन्चार्ज आर. आर. पाटील यांनी, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयाला आतापर्यंत मिळालेले विविध पुरस्कार व उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. महाविद्यालायला लाइफ ब्लूमस इंडियाकडून ‘महाराष्ट्र आयकॉन’ पुरस्कार प्राप्त झाल्याने महाविद्यालयाने एक वेगळी ऊंची गाठल्याचे समाधान प्राचार्य शेलार यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट फीडबॅक मिळविलेले प्राध्यापक अनुक्रमे प्रा. एस. एल. राऊत, डॉ. एस. एम. घोलपे व प्रा. आर. आर. पाटील यांचा सत्कार प्राचार्य प्रा. शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धैर्यशील काजळे व योगिता रणनवरे व प्रा. एम. एन. केंगरे यांनी यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तळसंदे: नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डी.एन. शेलार.