बाहुबलीमध्ये गुरूकुलच्या विद्यार्थ्यांसाठी नुतन भोजनालयाचा वास्तुविधान संपन्न
कुंभोज प्रतिनिधी, (विनोद शिंगे):- बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ मध्ये बांधण्यात आलेल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी नवनिर्मित भोजनालयाचा वास्तुविधान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जीन प्रतिमेसह प्रवेश, अभिषेक आणि शांतीधारा, शांतीहोम, वास्तुविधान व आरती असे विविध कार्यक्रम पार पडले. श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम स्तवनिधी चे अध्यक्ष जिनरत्न रोटे व सुनिता रोटे यांच्या शुभहस्ते अभिषेक व वास्तुविधान संपन्न झाले.यावेळी गुरुकुल विद्यार्थी, अध्यापक, अध्यापिका, श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.